म्हसवड मधील एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

म्हसवड मधील एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह


म्हसवड मधील एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/प्रतिनिधी : म्हसवड मध्ये  एकाच कुटुंबातील नवीन पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत. तीन दिवसापुर्वी येथील मुख्य पेठेतील एक व्यापारी कोविड पॉझिटीव्ह सापडला होता. या रुग्णाच्या संपर्क आलेले एकाच कुटुंबातील आणखी पाच जणाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये रुग्णाचे दोन भाऊ, मुलगा, सुन व भावाची अकरा वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. आता पर्यंत शहरातील ८ रुग्ण सापडले असून त्यापैकी २ बरे झाले आहेत.
या रुग्णाचा मुलगा व सून डॉक्टर आहेत. त्यांच्या संपर्कात सुमारे शंभर लोक आले आहेत. यामुळे म्हसवडकरांची काळजी वाढली आहे. तर घरातच तीन दिवस या रुग्णावर उपचार करण्यात आले होते. याबाबत उलटसुलट चर्चा आहे. खडकी येथील महिला बाधीत आढळली आहे. तर कोळेवाडी येथील ४७ वर्षीय व्यक्ती चा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. म्हसवड शहरातील मेडीकल दुकानासह सर्व दुकाने बंद केली असून शहर पुर्ण लॉकडाऊन केले आहे.
म्हसवड शहराच्या मध्यभागातील लोकवस्तीत कोरोना बाधीत  रुग्ण सापडल्यामुळे खबरदारीची उपाययोजना अंतर्गत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी शहरातील काही भाग प्रतिबंधीत क्षेत्र व झोन व बफर क्षेत्र जाहीर केले.
प्रतिबंधित क्षेत्रात महात्मा फुले चौक परिसर, पंढरपुर नाका ते सिध्दनाथ मुख्य पेठ, कासार बोळ, गुरवगल्ली, सिध्दनाथ मंदीर परिसर, शिवाजी चौक परिसर, भगवानगल्ली परिसर, जैन मंदिर परिसर, रामोशीवस्ती, म्हसवड गावठाण परिसर, यात्रा पटांगण, माळी गल्ली, शिंगणापूर चौक परिसर, एसटी स्टँड परिसर व चोपडे वस्ती हा प्रतिबंधक परिसर म्हणून घोषित केला आहे.
बफरझोन मध्ये शिक्षक कॉलनी,पोलिस ठाणे परिसर, ढोर कारखाना, मल्हार नगर, डावकरे वस्ती, बेघरवस्ती, पेट्रोलपंप परिसर, झगडेवस्ती, शासकीय विश्रांतीगृह परिसर, काळापट्टा, उद्यमनगर हा परिसर घोषित केलेला आहे.
प्रांताधिकारी यांच्या आदेशानंतर पालिकेसह नागरिकांनी ठिकठिकाणचे रस्ते बंद केले आहेत. म्हसवड नजिकच्या पाटोळ खडकी येथीलही एक ५४ वर्षीय महिला कोरोना बाधीत  सापडल्यामुळे या गावाकडे जाणारा म्हसवड-इंजबाव रस्ताही सील करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise