तरंगफळ येथे गॅसच्या गळतीमुळे आईसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 2, 2020

तरंगफळ येथे गॅसच्या गळतीमुळे आईसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू


तरंगफळ येथे गॅसच्या गळतीमुळे आईसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
माणदेश एक्सप्रेस न्युज
 माळशिरस/संजय हुलगे : तरंगफळ ता. माळशिरस येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसच्या गळतीमुळे अचानक लागलेल्या आगीने आई व दोन मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये आई सोनाली ज्ञानेश्वर शिंदे (वय 30) सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय 7) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय 5) अशी मृत्यू झालेल्यांची नवे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आई सोनल ही सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला. आई घराच्या बाहेर होती व लहान मुले झोपलेल्या अवस्थेत होती. त्या मुलांना काढण्यासाठी आई घरामध्ये गेली. परंतु आगीचा भडका वाढत गेला होता त्यामुळे दरवाजातून  बाहेर निघू शकत नसल्यामुळे गावकऱ्यांनी पाठीमागील भिंत पाडून दोन लहान मुले व आई यांना बाहेर काढले. व त्यांना अकलूज येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथे एक मुलगा सावळा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला होता. आई व दुसरा मुलगा यांना सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे नेत असताना लहान मुलगा कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला. तर आई सोनल हिच्यावर त्यांच्यावर उपचार चालू असताना सोनालीही मृत्यु झाला. 
या घटनेचा पंचनामा माळशिरसचे मंडळ अधिकारी श्री. लकडे यांनी केला असून यामध्ये घरातील  तीन लाख रुपयांचे व  तसेच शेजारील घराचे पन्नास हजार एवढे नुकसान झाले आहे.

गॅस मुळे लागलेल्या आगीत भडका होऊन स्फोट होऊ शकतो म्हणून गावातील लोक भयभीत होऊन घराच्या बाहेर निघून जात होती. अशातच गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून  घरातील गॅस च्या दोन टाक्या बाहेर ओढून काढल्या व भिंत पाडून त्यांना बाहेर काढले.

No comments:

Post a Comment

Advertise