आटपाडी तालुक्यात 2 नवे कोरोना पॉझिटीव्ह गोमेवाडी येथील ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची मुले कोरोनाग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 1, 2020

आटपाडी तालुक्यात 2 नवे कोरोना पॉझिटीव्ह गोमेवाडी येथील ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची मुले कोरोनाग्रस्त

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी तालुक्यात 2 नवे कोरोना पॉझिटीव्ह
गोमेवाडी येथील ‘त्या’ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची मुले कोरोनाग्रस्त
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये आज दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गोमेवाडी येथे मुंबईहून आलेल्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच रुग्णाच्या मुलाला व मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.

गोमेवाडी येथे आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कात आलेली त्याची मुलगी व मुलगा यांना त्रास होवू लागला होता व कोरोनाची लक्षणे दिसून लागली होती. त्यामुळे त्यांचा दिनांक ३० रोजी स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यामध्ये दोघांचा कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली असून त्यांना मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात हलविणेत आले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise