Type Here to Get Search Results !

लालबागचा राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

udhav thakre mandesh ekspres news

लालबागचा राजा मंडळाचा कौतुकास्पद निर्णय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. त्यांनी याबाबत टिवट करून मंडळाचे अभिनंदन केले आहे. राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला आहे. या निर्णयाने राज्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार आहे. मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी कोरोना विरोधातील लढ्यात जे पोलीस शिपाई आणि अधिकारी शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबांचा सन्मान मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत केला जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये देण्याची घोषणाही मंडळाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies