Type Here to Get Search Results !

जांभुळणीतील प्रायोगिक तत्वावरील मत्स्यपालनास यश ; रोहू, कटला, सीपर्णीस चिलापी विक्रीस


जांभुळणीतील प्रायोगिक तत्वावरील मत्स्यपालनास यश ; रोहू, कटला, सीपर्णीस चिलापी विक्रीस
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जांभुळणी ता. आटपाडी, जि.सांगली येथे सुरु केलेल्या प्रायोगिक तत्वावरील मत्स्यपालनास यश आले आहे.
याबाबत अधिका माहिती अशी की, दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी गावच्या नैसर्गिक ओढ्यावर 200 मीटर अंतरावर 4 ठिकाणी पाणी साठवून सिमेंट बांध व केटीवेअर मध्ये 1 लाख या प्रमाणात रोहू, कटला, सीपर्णीस चिलापी असे मत्स्यबीज सोडले होते. आता  जून 2020 रोजी त्याची जागेवर 300, 500 ग्राम पासून 1 ते 2 किलो पर्यंत मासे मिळतात. 3 दिवसात 50 किलो पर्यंत विक्री झाली आहे. चिलापी 150, सीपर्णीस 240 या रुपये प्रति किलो दराने माशांची  विक्री सुरू आहे. सध्या एका बंधाऱ्यातील मत्स्य विक्री सुरू असून अजून तीन बंधाऱ्यातील विक्री सुरु झालेली नाही. गावातील मित्र मंडळ व वैयक्तिक शेतकरी यांनी ग्रामपंचायतीस ठराविक रक्कम देऊन गावातच रोजगार मिळावा बाहेर जायला नको या उद्देशाने या व्यवसायास सुरवात केली होती. मत्स्यपालन खाद्य देणे ते विक्री व्यवस्थापन हे सर्व मित्र मंडळ एकत्रित काम करते. सध्या त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत असून मोठ्या प्रमाणात विक्री वाढल्यास त्याचा फायदा मोठा होणार असून ज्यांना माशे हवे आहेत त्यांनी 8104971161, 9527563201 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies