Type Here to Get Search Results !

कोरोना साथीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती


कोरोना साथीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची भरती
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर तीन महिन्याकरिता विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये फिजिशियन, अॅनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एक्स रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट, डिईओ या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर तीन महिन्याकरिता भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ८ ते १० जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली येथे प्रत्यक्षात किंवा  covid19sangli@gmail.com  या ईमेलवर अर्ज सादर करावा.
 अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी अथवा पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्टेशन प्रमाणपत्र (as applicable), शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव, उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो, विहित नमुन्यातील अर्जाच्या नमुन्यासह एकाच पीडीएफ फाईल lमध्ये इमेलवर सादर करावा. अर्ज ई-मेल करण्याकरिता गाव पातळीवरील आपले सरकार सेवा केंद्राचाही वापर करता येईल. उमेदवारांचे अर्ज प्रत्यक्ष अथवा इमेल द्वारे स्वीकारण्यात येतील. पोस्टाद्वारे अथवा कुरियरद्वारे कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत. एका उमेदवाराने एकाच पदासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. तरी इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्जासह विहित कालावधीत विहित पद्धतीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies