Type Here to Get Search Results !

दिघंची विकास सोसायटी कडून सभासदांची अडवणूक ; मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप ; सरपंच अमोल मोरे यांचा उपोषणाचा इशारा


दिघंची विकास सोसायटी कडून सभासदांची अडवणूक ; मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप ; सरपंच अमोल मोरे यांचा उपोषणाचा इशारा
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/वार्ताहर : दिघंची विकास सोसायटी ही सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी विकास सोसायटी आहे. शेतकरी सभासदांच्या जोरावर सोसायटीने गरुड झेप घेतली. परंतु सध्या शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांनाच अजून अडचणीत आणण्याचा प्रकार दिघंची सोसायटीमध्ये घडत आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभांश वाटप देखील करण्यात आलेला नाही. अनेक उत्पन्नाची साधने असताना देखील सभासदांना न्याय मिळत नाही. त्यामुळे सर्व गोष्टी पारदर्शकपणे गावासमोर व सभासदांसमोर न मांडल्यास उपोषणाचा इशारा दिघंचीचे सरपंच अमोल मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे
सोसायटीचे संस्थापक चेअरमन हयात असताना त्यांनी वार्षिक लाभांश सभासदांना प्रामाणिकपणे दिला. परंतु त्यानंतर सभासदांना लाभांश वाटप करण्यात आलेला नाही. याउलट शेतकरी अडचणीत असताना पिक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सोसायटी मधून केली जात आहे. दुष्काळ अवकाळी व त्यानंतर कोरोना महामारी मुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अजून अडचणीत सापडला आहे.
दिघंची विकास सोसायटी चा स्वतःचा पेट्रोल पंप आहे. तो चांगल्या पद्धतीने चालतो. परंतु त्याचा फायदा शेतकरी सभासदांना व सोसायटीला न होता त्याचा फायदा फक्त एका कुटुंबाला होत आहे. त्याचा सभासदांना काडीमात्र फायदा झालेला नाही. कोणत्या नियमानुसार व निकषानुसार ह्या पंपाचा फायदा त्या कुटुंबाला मिळतो याची माहिती लेखी स्वरूपात सोसायटीने उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना कोणतीही ही अडवणूक न करता पिक कर्ज दिले पाहिजे व सभासदांना लाभांश वाटप झाला पाहिजे. अन्यथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी येथे सभासदां सोबत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच अमोल मोरे यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यात लौकिक मिळवलेल्या सोसायटी मध्ये अनागोंदी कारभार चालू असून भ्रष्टाचाराचे कुरण माजले आहे. कर्ज वाटप, पिक कर्ज, फिरवाफिरवी करणे, पेट्रोल पंप,  स्वस्त धान्य दुकान, खते व बी बियाणे दुकान, अशा अनेक माध्यमातून फक्त पैसा गोळा करायचा आणि सोसायटी चा वार्षिक ताळेबंद दाखवताना रीतसर पणे भ्रष्टाचार करून माया गोळा करायची असा उद्योग सुरू असून लवकरच त्याची पाळेमुळे खणून काढू व शेतकरी सभासदांना हक्काची विकास सोसायटी शेतकऱ्यांच्या ताब्यात घेवू.
अमोल मोरे
सरपंच ग्रामपंचायत,दिघंची 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies