Type Here to Get Search Results !

बँक ऑफ इंडियाच्या माळशिरस शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर बँक व्यवस्थापकाचे दुर्लक्ष ; खातेदारांचा ठिय्या मात्र बस स्थानकात


बँक ऑफ इंडियाच्या माळशिरस शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तर बँक व्यवस्थापकाचे दुर्लक्ष ; खातेदारांचा ठिय्या मात्र बस स्थानकात 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : सध्या शहरात अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत खातेदारांची रोजच गर्दी होत असून याबाबत कसले ही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसून बँक व्यवस्थापकाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. कोरोमामुळे सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाकडून सर्व सरकारी कार्यालये, खाजगी संस्था मध्ये शासनाचे कोरोना बाबतचे सर्व नियम पाळून काम करावे असे आदेश आहेत. यासाठी शासन सुध्दा गंभीर असून सामान्य नांगरीकांनी ही नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने नांगरीकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनेटाझर चा वापर करणे आदि बंधने घातली आहेत. सर्वत्र जरी याची अंमलबजावणी होत असली तरी सुद्धा माळशिरस येथील बॅक ऑफ इंडिया च्या शाखेत कसले ही नियम पाळले जात नाहीत. बॅकेची शाखा माळशिरस मध्ये आळंदी पंढरपूर या महामार्गावर असल्यामुळे बँकेच्या आत व बाहेर सुध्दा अपुरी जागा असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी बँकेच्या प्रवेशव्दारासह मेन रस्त्यावर होते आहे. त्यामुळे सोशल डिसटन्सिंगचे कसले ही नियम पाळले जात नाहीत. 
गेल्या शनिवार, सोमवार रोजी बँकेने सर्व खातेदारांना माळशिरस येथील बस स्थानकामध्ये नेऊन उभा केले होते. तेथे बॅकेचे झिरो कर्मचारी उभा राहून त्यांना सूचना करीत आहेत तर बँकेच्या दरवाजासमोर सिक्युरिटी मात्र आपल्या जवळच्या किंवा  पुढारी कपडेवालेल्या लाईनला न उभा करता लगेच नंबर देत आहे. तर सर्व सामान्य शेतकऱ्याला मात्र लाईनला ४ तास  उभे राहुण पैसे काढावे लागत असून खातेदाराना  पासबुक छापुन दिले जात नाही. त्यामुळे आपला नंबर कधी येणार याबाबत अनेक  खातेदाराचा सभ्रम निर्माण होत होता.
या सर्व प्रकाराच्या वेळी बँकेचे व्यवस्थापक बँकेतील आपल्या चेंबर मध्ये न बसता मागील अंधाऱ्या खोलीत बसलेले असतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थाकाला मात्र या महामारीच्या रोगाचे कसले ही गांभीर्य दिसत नाही. नगरपंचायतीचे सुध्दा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अथक प्रयत्न चालू आहेत. पण गांभीर्य नसलेल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यामुळे हा रोग माळशिरस मध्ये येईल का? अशी चर्चा आज बॅकेच्या परिसरामध्ये चालू होती.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies