आटपाडी येथील धाडसी चोरी उजेडात : सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण कडुन उलगडा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, June 2, 2020

आटपाडी येथील धाडसी चोरी उजेडात : सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण कडुन उलगडा


आटपाडी येथील धाडसी चोरी उजेडात
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण कडुन उलगडा
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील दिनांक 07/10/2019 रोजी झालेल्या 11 लाख 62 हजाराच्या चोरीचा छडा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.०७/१०/२०१९ रोजी आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत कॅश कलेक्शन व भरणा करणारे कंपनीचे कर्मचारी मोहन शिंदे हे मोटर सायकल वरून आटपाडी येथील फिल्पकार्ट, एलआयसी, इंन्स्टाकार्ट, डिलीव्हरी डॉट कॉम कंपनी व ईको एक्सप्रेस कंपनीची ११६२०३१/- रूपये कॅश घेवुन करगणी बँकेमध्ये घेवुन जात असताना वाटेत अज्ञात दोन इसमांनी मोटर सायकल वरून येऊन अडवुन त्यांचेकडील असलेली बॅगमधील ११६२०३१/- रूपये रोख रक्कम जबरदस्तीने मारहाण करून चोरून नेली होती.
 याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे कॅश कलेक्श्न व भरणा करणारे कर्मचारी श्री.मोहन सुखदेव शिंदे वय.३४ धंदा.खाजगी नोकरी रा.आटपाडी यांनी याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमाबाबत फिर्याद दिली होती.
मा. पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम, यांनी सांगली जिल्हयातील अभिलेखावरील घरफोडी, जबरी चोरी, रोड रॉबरी, मोटार सायकल चोरी, यासारखे आरोपी चेक करीत, गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी प्रत्येक विभागात अधिकारी कर्मचारी याचे खास पथक तयार करुन पेट्रोलिंग करीत जिल्हयातील अभिलेखावरील घरफोडी, जबरी चोरी, रोड रॉबरी, मोटार सायकल चोरी, यासारखे आरोपी चेक करीत, गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या, त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिदे, पोहेकॉ/बिरोबा नरळे, निलेश कदम, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलवडे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, शंकर पाटील असे सांगली शहरात पेट्रोलींग व अभिलेखावरील आरोपी चेक करीत असताना पथकास बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, तीन संशयीत इसम इसम हे विना नंबरची काळी लाल रंगाची बजाज पल्सर मोटर सायकल घेवुन संशयीतरित्या सांगली आरटीओ कार्यालयाचे बस स्टॉप जवळ थांबले आहेत अशी माहीती मिळाली. मिळाले बातमीप्रमाणे वरिल अधिकारी व कर्मचारी यांनी त्या ठिकाणी छापा मारून वरिल संशयीत तिघांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचे कब्जात रोख रक्कम मिळुन आली तसेच त्यांचे कब्जात विना क्रमांकाची बजाज पल्सर २२० मोटर सायकल मिळुन आली यावरून त्यांचा संशय आल्याने त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारले तेव्हा त्यांनी आपण आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील वरिल नमुद गुन्हा केल्याचे सांगीतले. ताब्यातील इसमांची नांवे १. धनराज ऊर्फ सोन्या सतीश पाटील वय.२५ रा.शिवाजी हौ.सोसा. साखर कारखान्यासमोर सांगली २. रोहीत शशिकांत भगत वय.१९ रा.बिसुर ता.मिरज जि.सांगली लक्ष्मण मारूती सिंदगी वय.२३ रा.साखर कारखाना वसाहत सांगली असे असुन त्यांचे कब्जातुन गुन्हयातील रोख रक्कम ४,१०,०००/- रूपये, ३ महागडे मोबाईल ११५०००/- व गुन्हयात वापरलेले वाहन एक बजाज पल्सर २२० मोटर सायकल ९५०००/- असा एकुण ६,२०,०००/- रू किंमतीचा मुद्दमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यातील आरोपी यांनी यातील फिर्यादी हा नेहमी कॅश कलेक्शन करीता येत असता त्याचेवरती पाळत ठेवुन तो आटपाडी येथुन वेगवेगळया कंपनीची कॅश कलेक्श्न करून ती कॅश करगणी बॅकेचे बॅच मध्ये भरणा करण्यासाठी जात असताना त्यास वाटेत अडवुन जबरीने रोख रक्कम काढुन घेवुन हा सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, पोहेकॉ/बिरोबा नरळे, संतोष गळवे, निलेश कदम, सागर लवटे, संदिप गुरव, संदिप नलावडे, अनिल कोळेकर, शंकर पाटील यांनी केली.

No comments:

Post a Comment

Advertise