Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात कोरोनाने पार केला २०० चा आकडा ; एकूण कोरोना पॉझिटीव्ह २०२ : आटपाडी तालुक्यात गळवेवाडी येथील एकाचा समावेश


सांगली जिल्ह्यात कोरोनाने पार केला २०० चा आकडा
एकूण कोरोना पॉझिटीव्ह २०२ :  आटपाडी तालुक्यात गळवेवाडी येथील एकाचा समावेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे एकूण १० नवे रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २०२ झाली आहे. तर आटपाडी तालुक्यातील गळवेवाडीत येथील ६५ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रास्तांची संख्या २५ झाली आहे.
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील ६ जण, रिळे येथील ७६ वर्षीय महिला, सोनी ता, मिरज येथील ३९ वर्षीय पुरुष, लादेवाडी ता. शिराळा येथील ४२ वर्षीय पुरुष तर गळवेवाडी ता. आटपाडी, जि. सागंली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल काल पॉझिटीव्ह आला आहे. तर तालुक्यातील गळवेवाडी येथे प्रशासनाने भेट दिली असून पुढील उपाययोजना करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies