Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी 13 जून पर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घ्यावे : मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी 13 जून पर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घ्यावे : मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर तीन महिन्याकरिता आवश्यक दहा पदभरतीसाठी दि. 10 जून पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी दि. 10 जून 2020 अखेर ई-मेलव्दारे व प्रत्यक्षात अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन दिनांक 11, 12 व 13 जून 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा परिषद शेजारी असलेल्या उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात येत आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिनांक 13 जून 2020 पर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. फिजिशियन, ॲनेस्थेटिस्ट, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, एक्स रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट, डिईओ या दहा पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर तीन महिन्याकरिता पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पदांसाठी दि. 10 जून 2020 अखेर ई-मेलव्दारे / प्रत्यक्षात अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी मुळ कागदपत्रासह हजर राहून डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करून घ्यावे. तसेच ई-मेल वर अर्ज केलेल्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला येतेवेळी डॉक्युमेंटची एक झेरॉक्स प्रत जमा करण्यासाठी घेऊन यावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies