Type Here to Get Search Results !

'निसर्ग' चक्रीवादळ दोन तास आधीच किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता ; किनारपट्टी भागात पावसाला


'निसर्ग' चक्रीवादळ दोन तास आधीच किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता ; किनारपट्टी भागात पावसाला 
मुंबई: निसर्ग चक्रीवादळ दोन तास आधीच राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून सध्या किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे वादळाचं चक्रीवादळात रूपांतर होऊन तेराज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर मुंबईसह किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून ८५- ९५ ताशी वेगानं वारे वाहत आहे. साधारण हा वेग ११० किमीपर्यत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर असणारं चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies