महिला आरोग्य अधिकाऱ्याचा विनयभंग ; आरोग्यसेवकावर गुन्हा दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, June 15, 2020

महिला आरोग्य अधिकाऱ्याचा विनयभंग ; आरोग्यसेवकावर गुन्हा दाखल


महिला आरोग्य अधिकाऱ्याचा विनयभंग ; आरोग्यसेवकावर गुन्हा दाखल 
दहिवडी : माण तालुक्यातील नरवणे येथे महिला आरोग्य अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोग्य सेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू गंबरे (रा-पळशी) असे आरोग्य सेवकाचे नाव आहे. गंबरे याने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत व वाईट भावनेने बघितल्याने त्याच्या विरोधात दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सबंधित महिला आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 12 जूनला साडे दहाच्या सुमारास मी नरवणे येथे आली असता, मी नेहमी बसत असलेल्या खुर्चीवर आरोग्य सेवक अधिक गंबरे हे बसले होते. मला ओपीडीचे काम करावयाचे असल्याने मी अधिक गंबरे यांना खुर्चीवरून उठण्याबाबत विनंती केली असता त्यांनी मला अरेरावीची भाषा वापरून 'जा बाई तुला कुठ जायचे ते जा माझं कोण काय ....... ते बघतो' असे म्हणून त्यांनी मला शिविगाळ केली. तसेच वाईट भावनेने बराच वेळ माझ्याकडे बघितल्याचे संबधित महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे.अधिक गंबरे यांनी मला शिवीगाळ करत, 'तुझी चप्पल बाहेर काढ नाहीतर चप्पल बाहेर टाकून दे' तुझ्यासाठी काही वेगळा नियम नाही असे अर्वाच्य भाषेत बोलला. तसेच तूला ओपीडी करायचा काय अधिकार नाही, ती करायची की नाही ते मी ठरवीण असे अधिक गंबरे बोलल्याचे संबंधित महिलेने सांगितले. याबाबत मी माझे वरिष्ठ डॉ. एल.डी.कोडलकर (तालुका आरोग्य अधिकारी) यांना लेखी पत्र देऊन, 12 जूनला तक्रार देण्यास दहिवडी पोलीस स्टेशनला आल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी भा.द.वि कलम 354,506,504 नुसार गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास स.पो.नि राजकुमार भुजबळ करत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise