Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात खालील ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात


सांगली जिल्ह्यात खालील ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील खालील ठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 
दत्त कॉलनी (पूर्व), गल्ली क्रमांक 5, मालगाव रोड, मिरज 
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे  : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत 1) नारायण स्मृती बंगला, 2) सलिम शेख घर 3) गुरू जकाते घर 4) प्रविण साळुंखे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे  : महानगरपालिका क्षेत्र 1) सुश्मा शिंदे घर 2) आकाश बंगला 3) शिवराज कोतवाल घर 4) मलिकजान शेख घर.

 खानापूर तालुका 
करंजे
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे : 1) पूर्व दिशा - अग्रणी नदी 2) पश्चिम दिशा - रामनगर रस्ता 3) दक्षिण दिशा - अग्रणी नदी 4) उत्तर दिशा - अग्रणी नदी, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व दिशा - एकेरी मळा 2) पश्चिम दिशा - मेटकरी वस्ती 3) दक्षिण दिशा - माने वस्ती अंगणवाडी 4) उत्तर दिशा - मदने मळा.

गोरेवाडी 
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे  : 1) पूर्व दिशा - बलवडी शीव तानाजी तुकाराम गायकवाड यांच्या शेतापर्यंत 2) पश्चिम दिशा - एस.टी. पिक अप शेड गोरेवाडी ते खानापूरकडे जाणारा रस्ता 3) दक्षिण दिशा - लक्ष्मण जयसिंग गायकवाड यांच्या शेत जमीनी पर्यंत 4) उत्तर दिशा - शंकर काका गायकवाड यांच्या शेत जमीनीपर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व दिशा - बलवडी शीव तानाजी तुकाराम गायकवाड यांच्या शेतापर्यंत 2) पश्चिम दिशा - रामचंद्र बाबा शेळके यांच्या शेतजमीनीपर्यंत जाधवाडी गोरेवाडी शीव 3) दक्षिण दिशा - काका सुबराव भगत यांच्या शेत जमीनीपर्यंत 4) उत्तर दिशा - धोंडीराम पांडुरंग वत्रे यांच्या शेत जमीनीपर्यंत.

जत तालुका 
आवंढी
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - 1) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या उत्तरेकडे आवंढी लोहगाव रस्त्यावरील वामन काशिद यांच्या घरापर्यंत 2) आवंढी गावामधील ईशान्य दिशेला सरकारी फॉरेस्ट बैल पठारपर्यंत 3) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पूर्वेकडे सरकारी फॉरेस्ट कस्तुरी पठारपर्यंत 4) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या आग्नेय दिशेला राजाराम धोंडीराम कोडग यांच्या शेतापर्यंत 5) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या दक्षिणेकडे आवंढी सोनंद रस्त्यावरील तुकाराम यशवंत कोडग यांच्या विहीरीपर्यंत 6) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या नैऋत्येकडे गुंडीराम सोपान कोडग यांच्या घरापर्यंत 7) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पश्चिमेकडे औंढ ओढ्यालगत मनोहर विठ्ठल कोडग यांच्या घरापर्यंत 8) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या वायव्य दिशेला धोंडीराम विठोबा कोडग यांच्या शेतापर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या उत्तरेकडे आवंढी लोहगाव रस्त्यावरील रावसाहेब निवत्ती भोसले यांच्या शेतापर्यत 2) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या ईशान्य दिशेला सरकारी फॉरेस्ट बैल पठारपर्यंत 3) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पूर्वेकडे सरकारी फॉरेस्ट कस्तुरी पठारपर्यंत 4) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या आग्नेय दिशेला अंकुश केरू माने यांच्या शेतापर्यंत 5) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या दक्षिणेकडे आवंढी अंत्राळ रस्त्यावरील ज्ञानू शंकर गेजगे यांच्या घाटावरील शेतापर्यंत 6) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या नैऋत्येकडे आवंढी शेगाव रस्त्यावरील महादेव गणपती देशमुख यांच्या शेतापर्यंत 7) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पश्चिमेकडे आवंढी लक्ष्मीनगर सिंगनहळ्ळी रस्त्यावरील माणिक नारायण कोडग यांच्या शेतापर्यंत 8) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या वायव्य दिशेला आवंढी सोनंद रस्त्यावरील धनाजी महादेव सोळगे (सोळगेवाडी) यांच्या शेतापर्यंत.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies