Type Here to Get Search Results !

शेटफळेत एकजण कोरोना पॉझिटीव्ह


शेटफळेत एकजण कोरोना पॉझिटीव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शेटफळे ता. आटपाडी, जि.सांगली येथील ३९ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात कोरोनाचा १५ वा रुग्ण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेटफळे येथील रहिवाशी असणारा व्यक्ती हा एस.टी. आगारामध्ये चालक म्हणून काम करीत आहे. तो आटपाडी आगाराची बस घेवून मुंबई येथे गेला होता. तेथून तो मजुरांना घेवून छत्तीसगड येथे गेलो होता. या दरम्यान त्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यास मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात तपासणी करिता पाठविले असता त्यास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies