Type Here to Get Search Results !

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील एकावर सावकारी गुन्हा दाखल


माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील एकावर सावकारी गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : हात उसने घेतलेले पैसे परत देऊन ही ठरल्या प्रमाणे मुदत खरेदी दिलेली जागा परत करण्यास नकार देत असल्यामुळे दत्तात्रय विठोबा शेळके रा. गुरसाळे ता. माळशिरस यांच्या विरोधात माळशिरस पोलिसांत सावकारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माळशिरस पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार  निशिकांत धोंडिबा लोखंडे (रा.माळशिरस)  हे पंचायत समिती कार्यालयात मैल मजूर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी शेळके यांच्या पुणे येथील कंपनीस कामास असल्याने  त्यामुळे शेळके यांच्या बरोबर जवळीक झाली होती. घराचे अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी व मुलगा रत्नाकर याच्या लग्नासाठी चार लाख रूपये शेळके यांच्या कडून घेतले होते. हे परत पैसे परत दयावे यासाठी शेळके यांनी तगादा लावला होता. सदरचे पैसे तुम्हाला देणे होत नसल्याने  त्यांनी  माळशिरस येथील जागा मुदत खरेदी करून घेतली सदरची जागा चार वर्षांनी पैसे परत दिल्यानंतर नावावर करून देण्याच्या बोलीवर आम्ही मुदत खरेदी करून दिली. त्यानंतर त्यांनी दिलेली सर्व रक्कम हप्त्या हप्त्याने परत केली. त्यानंतर सदरची खरेदी दिलेली जागा पुन्हा आमच्या नावावर करणे बाबत विचारणा केली असता सदरच्या रकमेचे व्याज तुम्ही दिले नाही असे शेळके यांनी सांगितले वास्तविक पाहता सदरची रक्कम घेताना लेखी अथवा तोंडी व्याजा बाबत काही ठरलेले नव्हते. अशा आशयाची तक्रार  शेळके यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आसुन माळशिरस पोलिसांत सावकारी गुन्हा दाखल करण्यात आला आसुन सदर गुन्हयाचा तपास पोनी विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आदीनाथ महानवर हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies