Type Here to Get Search Results !

खरीपाच्या तोंडावर कृषी विभागाची धडक मोहीम ; बी-बियाणे, खते, औषधे विक्री दुकानदारांना नोटीस


खरीपाच्या तोंडावर कृषी विभागाची धडक मोहीम
 बी-बियाणे, खते, औषधे विक्री दुकानदारांना नोटीस 
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : तालुक्यात खरीप हंगाम तोंडावर आलेला असून तालुक्यातील काही भागात पेरणी सुरू झालेली आहे. मात्र सध्या पावसाच्या प्रमाणानुसार पेरणी क्षेत्र वाढणार आहे. नुकत्याच सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे कृषी क्षेत्राशी निगडित खते, बी-बियाणे अशा बाबतीत कृषी विभागाने लक्ष घातले असून तालुक्यात भरारी पथक नेमून त्रुटी आढळलेल्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आले असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीपात  बोगस खते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाऊ नये व शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने खते उपलब्ध व्हावी यासाठी कृषी सेवा केंद्रांची तालुका स्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येत असुन  यामध्ये अकलूज, निमगाव झिंजे वस्ती येथील कृषी दुकानांची  तपासणी करण्यात आली. त्यावेळी नियमाप्रमाणे बियाणे, खते, औषधे विक्री व नियमांचे पालन न केल्याने कृषी विक्री केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली  असून विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे. तसेच कृषी विक्री केंद्रांची गोडावूनची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी पथक प्रमुख उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे, नितीन चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती सागर टकले, मंडळ कृषी अधिकारी आदी अधिकार्यांजच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

खरीप हंगामासाठी खते व बी-बियाणे याबाबतीत कमतरता नाही शेतकऱ्यांनी या बाबतीत काळजी घ्यावी पक्की पावती घेणे ,योग्य किंमत लावल्याची खात्री करणे अशा गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे याबाबतीत दुकानदारा विषयी तक्रार असल्यास तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार करावी.
गजानन ननावरे
तालुका कृषी अधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies