वडजल येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, June 5, 2020

वडजल येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह


वडजल येथील ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : वडजल येथे मुंबई वरुन आलेला एक पुरुष कोरोना बाधित सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तात्काळ संपुर्ण गाव लॉकडाऊन करून गावच्या सीमा सील केल्या आहेत. तर जवळच्या आठ नातेवाईकांना म्हसवड येथे तात्काळ संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
वडजल (ता.माण) येथील ६७ वर्षीय व्यक्ती मुंबई (भांडुप) येथे पत्नी बरोबर त्यांच्या मुलीकडे  लॉकडॉऊन होण्यापूर्वी गेले होते. काही दिवस ते मुंबई मध्ये  राहिल्यानंतर ते गेल्या महिन्यात १७ तारखेला पत्नी मुलगी व नातू असे चौघेजण  मूळ वडजल गावी आले होते. गाव कोरोना आपत्ती समितीने त्यांना १४ दिवसासाठी क्वारंटाईन केले होते. 31तारखेच्या आसपास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरवातीला कुकुडवाड येथील खाजगी डॉक्टरकडे सल्ला घेतला तिथे काही निदान झाले नाही म्हणून ते म्हसवड येथील  हॉस्पिटल मध्ये दोन दिवस अॅडमिट झाले. नंतर वडूज येथील हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर यांचा सल्ला घेतला परंतु काही निदान झाले नाही. नंतर ते सातारा येथे एका खाजगी दवाखान्यात गेले असता तेथील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असताना त्यांना कोरोना रोगाची लक्षणे असल्याचे दिसून आली .तात्काळ तेथील डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकारी कोडलकर यांच्याशी संपर्क केला. परवा रात्री दोन वाजता त्या 67 वर्षीय व्यक्तीला तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकताच त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या व्यक्तीला कोरोना ची लागण झाल्याचे निदर्शनास आहे.
तालुक्याच्या तहसीलदार सौ.माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण  कोडलकर, सपोनि गणेश वाघमोडे, ग्रामसेवक संतोषकुमार  माळवे, सरपंच, तलाठी, पाटील  पोलीस यांनी तात्काळ वडजल मध्ये येऊन गाव संपूर्ण लॉकडाऊन केले. तसेच गावात येणारे सर्व रस्ते सील  केले आहेत. प्रशासकीय अधिकारी यांनी गावातील लोकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या  असून बाधित व्यक्तीच्या सहवासातील व कुटुंबातील आठ जणांना म्हसवड येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर कुकुडवाड येथील दोन व म्हसवड येथील एक हॉस्पिटल बंद केले आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise