Type Here to Get Search Results !

"आदर्श पर्यावरण मित्र" पुरस्कारासाठी 15 जून पर्यत नामांकन पाठवा : दत्तात्रय शिंदे


"आदर्श पर्यावरण मित्र" पुरस्कारासाठी 15 जून पर्यत नामांकन पाठवा : दत्तात्रय शिंदे
माणदेश एक्सप्रेस न्युज
खानापूर/प्रतिनिधी : वसुंधरा संस्था आयोजित पर्यावरण मित्र पुरस्कार 2020 साठी 15 जून पर्यत नामांकन पाठविण्याचे आवाहन वसुंधरा पर्यावरण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.
घरच्या घरीच पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी व पर्यावरण चळवळ गतीमान करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा पर्यावरण संस्थेने एक विशेष स्पर्धा/पुरस्कार आयोजित केला आहे. घरच्या घरी सोशल डिस्टंसिंग व शासनाच्या नियमांचे पालन करून वृक्षारोपण, पर्यावरण पूरक उपक्रम, प्राणी मात्रास मदत, धान्याची रांगोळी, चित्रकला, निबंध, यासोबतच पर्यावरणपूरक उपक्रम व कोरोना विषयी जनजागृतीचे उपक्रम करून सदर उपक्रमाची अद्यावत फोटो व माहितीची फाईल व्हाट्सअप च्या माध्यमातून अथवा ई-मेलच्या माध्यमातून संस्थेकडे पाठवावे स्पर्धा कालावधी 15 जून पर्यंत राहील आपण पाठवलेल्या प्रस्तावाचे अचूक मूल्यांकन करून आपणास आदर्श पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित केले जाईल. इच्छुकांनी आधिक माहितीसाठी संस्था पदाधिकाऱ्यांशी 8605109355,  9860609973, 9156625328, 7758954635, 9850532140, 8600320547 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies