Type Here to Get Search Results !

राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन ; गृहमंत्री अनिल देशमुख : १ लाख २४ हजार गुन्हे दाखल ; ६ कोटी ८६ लाखांचा दंड वसूल


राज्यात ५ लाख ९४ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन
गृहमंत्री अनिल देशमुख : १ लाख २४ हजार गुन्हे दाखल ; ६ कोटी ८६ लाखांचा दंड वसूल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ९३७ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९४ हजार ५४३  व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते ९ जून या कालावधीत कलम १८८ नुसार  १,२४,३६९ गुन्हे नोंद झाले असून २३,९८६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ८६ लाख ७४ हजार ६९१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर-१ लाख फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०१,०९७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का  आहे अशा ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९४,५४३ व्यक्ती क्वारंटाईन आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८०,८९० वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९० पोलीस अधिकारी व १२६९ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रिलिफ कॅम्प
राज्यात सध्या एकूण २७४ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १२,६६४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies