Sad News ! चेकपोस्ट ड्युटीला असलेल्या शिक्षकाला ट्रक चालकाने उडविले ; शिक्षक जागीच ठार जत तालुक्यातील डफळापूर येथील घटना - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 12, 2020

Sad News ! चेकपोस्ट ड्युटीला असलेल्या शिक्षकाला ट्रक चालकाने उडविले ; शिक्षक जागीच ठार जत तालुक्यातील डफळापूर येथील घटना


माणदेश एक्सप्रेस न्युज
जत: जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले, त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब (पिंटू) सदाशिव कोरे वय- 36 रा. डफळापूर (शाळा कोळी वस्ती,डफळापूर) असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. तर संजय बसगौंडा चौगुले वय 30 हा थोडक्यात बजावला. डफळापूर स्टँडनजिक मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या आंतराष्ट्रीय चेक नाक्यावर वर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता.
सिमेंटने भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता. घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय 37 रा.नाथाचीवाडी ता. दौंड जि.पुणे), (ट्रक नं.एम एच 12 एल डी 9749) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, डीवायएसपी दिलीप जगदाळे, पोलिस निरिक्षक राजाराम शेळके घटनास्थळी भेट दिली.
अथनीकडून ट्रक चालक ट्रक घेवुन आला असता त्यास त्या ठिकाणी डयुटीवर असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे वय 35 रा. डफळापुर ता. जत यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे यांना शिवीगाळ करुन तेथुन निघुन गेला. त्यास परत थांबविण्यासाठी ऑपरेटर चौगले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूर पर्यंत पाठलाग करुन त्यांनी त्यांची गाडी ट्रकच्या पुढे काढुन गाडी बाजुला लावुन परत ट्रक थांबवण्यास सांगितले असता ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे याना ट्रकने उडवुन देवुन कोरे यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे.
याबाबत माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांना twitter च्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली असून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून नाकाबंदीचे सेवाकर्तव्य निभावत उभे राहिलेले शिक्षक नानासाहेब सदाशिव कोरे यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. समाज घडवणारे शिक्षक आपल्या सामाजिक कर्तव्यापुढे प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, याची शासन दखल घेईल. असे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

Advertise