खरसुंडीत विहिरीतील मोटारी चोरणाऱ्या दोघांना अटक; चोरलेल्या दोन मोटारी व चोरट्याने वापरलेली बुलेटसह एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 11, 2020

खरसुंडीत विहिरीतील मोटारी चोरणाऱ्या दोघांना अटक; चोरलेल्या दोन मोटारी व चोरट्याने वापरलेली बुलेटसह एकुण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/प्रतिनिधी : विहिरीतील पाण्याची मोटर चोरून त्या विक्रीस नेताना खरसुंडी येथे दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आटपाडी पोलिसांना यश आले.
 याबाबत अधिक माहिती अशी की, खरसुंडी गावच्या हद्दीत टेंभू योजनेच्या कालव्यालगत जवळ प्रमोद सिद्धेश्वर सैंब आणि सतीश कालिदास पुजारी यांचे मालकाच्या शेत जमिनीमध्ये असलेल्या विहिरीतील पाण्याच्या मोटारी दि. ९ मे २०२० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाणे येथे दिनांक १० मे रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आटपाडी पोलिसांनी शिताफीने याचा तपास केला. त्यांना यातील संशयित चोरटे हे मोटरसायकलवरून सदरच्या मोटारी विक्री करण्यासाठी खरसुंडी भिवघाट रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आटपाडी पोलिसांनी हालचाल करून आरोपी संतोष जालिंदर गायकवाड वय. २३ वर्षे (रा.चिंचाळे) व भागवत देविदास कटरे वय.२२ वर्षे (रा.खरसुंडी) यांना खरसुंडी-धावडवाडी रोडवरून जाताना  खरसुंडी गावातील काही शेतकरी व पोलीस मित्रांच्या सहाय्याने सापळा रचून पकडले. त्यांना बुलेट गाडी नंबर एम.एच १० बीएफ ४००१ या मोटरसायकलवरून डबल सीट  मध्ये एक पोते घेऊन जात असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून पोते चेक केले असता त्यामध्ये चोरीस गेलेली एक पाण्यातील मोटर मिळून आली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी दुसरे मोटर आरोपी संतोष गायकवाड यांचे घरासमोर असलेल्या गवतामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन्ही मोटारी पोलिसांनी जप्त केले असून आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कारवाई आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली खरसुंडी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार संजय परशकर, पोलीस नाईक संताराम वगरे, सचिन लोंढे यांनी खरसुंडी गावातील शेतकरी, पोलीस मित्र यांच्या मदतीने केली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार संजय परशकर करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise