Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन यांचेकडून व वैभव पोरे यांचे प्रयत्नातून कोरोना प्रतिबंधक साधन सामुग्रीचे वाटप


रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन यांचेकडून व वैभव पोरे यांचे प्रयत्नातून कोरोना प्रतिबंधक साधन सामुग्रीचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : आज दि ८ मे २०२० रोजी पंचायत समिती माण, आरोग्य विभाग यांचे अंतर्गत कार्यरत ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक यांना ग्रामीण क्षेत्रामधील कोरोना सर्वेक्षण व प्रतिबंधासाठी लागणारा साधनसामुग्री म्हणजेच पीपीई कीट, थ्री लेअर मास्क, गोल्ज, Infrared non touch Thermometer इ. साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन,  यांचे सहकार्याने व वैभव पोरे यांचे योगदानातून सदर अत्यावश्यक साहित्य प्राप्त झाले. यामध्ये  PPE kit -20, Three layer mask -200, Infrared Thermometer- 2, Gloves -400 pairs चे अंदाजे ४८ हजार रुपयांचे साहित्य तालुका आरोग्य अधिकारी श्री कोडलकर यांचेकडे वैभव पोरे यांचे ज्येष्ठ बंधु सिद्धेश्वर रामचंद्र पोरे यांचे हस्ते  व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांचे उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.
वरील साहित्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निश्चित फायदेशीर ठरणार असून कोरोना साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजने कामी अत्यंत उपयुक्त व महत्वाचे आहे. वैभव पोरे यांचे विनंती व मागणीचा तात्काळ विचार करुन त्वरित मदत उपलब्ध करुन दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ पुणे डाऊन टाऊन यांचे आभार मानण्यात आले. यावेळी डॉ.मयुरी शेळके, डॉ.भरत काकडे, इतर सर्व स्टाफ तसेच अहिंसा पतसंस्थेचे बाबू मुल्ला, नितिन वाडेकर व म्हसवड मधील सुज्ञ नागरिक उपस्थित होते.
Join माणदेश एक्सप्रेस whatasapp

Join माणदेश एक्सप्रेस Telegram

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies