Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुका १७ मे पर्यंत लॉकडाऊनच राहणार ; अत्यावश्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय


आटपाडी तालुका १७ मे पर्यंत लॉकडाऊनच राहणार ; अत्यावश्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : देशामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने शहरामध्ये नोकरी व व्यवसायानिमित्त असणाऱ्या नागरिकांना प्रवाशी मुभा दिली असून त्यांना घरी जाता येणार आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात व शहरात मोठ्या संख्येने नोकरदार व व्यवसायानिमित्त बाहेर असलेले नागरिक येवू लागल्याने त्याचा धोका वाढण्याचा संभव असून दि. १७ मे पर्यंत आटपाडी शहरास तालुक्यामध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
यामध्ये अत्यावश्य सेवा वगळता किराणा मालाची दुकाने, शेती व्यवसायाशी निगडीत दुकाने तसेच मटण विक्री करणारी दुकाने ही आठवड्यातून  रविवार, मंगल्ह्वार्म बुधवार व शुक्रवारी या दिवशी संपूर्ण दिवसभर चालू राहतील तर शेतीशी निगडीत दुकाने ही दररोज सकाळी ८ ते २ वाजे पर्यत चालू राहतील. तर किराणा दुकाने ही सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी चालू राहतील तर किरकोळ भाजी विक्रते हे नेहमीप्रमाणे फिरून व्यवसाय करतील असे ठरले. 
बैठकीस माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जि.प. सदस्य अरुण बालटे, सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील, माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील, स्वाभिमानीचे भारततात्या पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, ग्रा.पं.सदस्य बाळसाहेब होनराव, रावसाहेबकाका पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील, प्रा.डॉ. अंकुश कोळेकर तसेच आटपाडी शहरातील व्यापारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies