Type Here to Get Search Results !

सामूहिक विलगीकरण कक्षास सरपंचांची भेट : लोकांचे केले कोरोनाबाबत मार्गदर्शन ; सामूहिक विलगीकरणाचे महत्व दिले पटवून

सरपंच वृषाली पाटील यांनी सामुहिक विलगीकरण कक्षास भेट देवून नागरिकांशी आरोग्याबाबत माहिती घेवून त्यांना मार्गदर्शन केले.

सामूहिक विलगीकरण कक्षास सरपंचांची भेट : लोकांचे केले कोरोनाबाबत मार्गदर्शन ;  सामूहिक विलगीकरणाचे महत्व दिले पटवून 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह प्रशासनातील घटक योजत असलेल्या उपाययोजनांना समाजातील सर्वांनी साथ देऊन  कोरोनामुक्त करुया असे आवाहन सौ. वृषालीताई पाटील सरपंच आटपाडी यांनी केले आहे.
पर जिल्ह्यातून व परराज्यातून तसेच परगावातून आलेल्या नागरिकांची सोय ग्रामपंचायत मार्फत विविध शाळां हायस्कूल व वसतिगृहामध्ये मध्ये केली आहे त्यापैकी जिल्हा परिषद शाळा नं१, राजारामबापू हायस्कूल,  वत्सलादेवी  गर्ल्स हायस्कूल व भवानी हायस्कूल तसेच पांढरेवाडी, काळीखडी व रानमळा  जिल्हा परिषद शाळा याठिकाणी शुक्रवार दिनांक 15 मे 2020 रोजी दिवसभर  तसेच  रात्री  10  वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन सरपंच वृषाली पाटील व धनंजय पाटील यांनी आलेल्या नागरिकांच्याकडे आरोग्याविषयी विचारपूस केली व त्यांना दिलासा देवून  स्वतःसाठी व कुटुंबासाठी कम्युनिटी क्वारंनटाईन किती महत्त्वाचे आहे हे आलेल्या नागरिकांना पटवून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आटपाडी मध्ये चालू असलेला उपायोजना बाबत नागरिकांनी समाधान व्यक्त  केले. कोरोणा विषाणूच्या अनुषंगाने  आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका, मदतनीस  व आरोग्य सेवक  यांना  सर्व नागरिकांनी  सन्मानाने वागणूक द्यावी तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी  प्रशासनला सहकार्य करावे असे आवाहनही सरपंच सौ वृषाली धनंजय पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies