लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील क्रिक्रेट बंद ! मैदाने पडली ओस - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील क्रिक्रेट बंद ! मैदाने पडली ओस


लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील क्रिक्रेट बंद ! मैदाने पडली ओस 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : मे महिना सुरू झाला की ग्रामीण भागात क्रिकेट स्पर्धेचे आयोजिन मोठ्या संख्येने केले जायचे. त्यासाठी प्रत्येक गावातील क्रिकेट मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू असायची. प्रयोजक शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागायची. बक्षीसाची रक्कम जेवढी मोठी तेवढी जास्त नोंदणीसाठी फी आकारली जात असे. मोठी रक्कम बक्षीस स्वरूपात असल्याने लांबून संघ येत. त्यांच्या राहण्याची, खाण्या, पिण्याची सोय संबंधित आयोजकाक करावी लागत. ग्रामीण भागातील या या क्रिकेट स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळायचा. पुरेसे मैदान असल्याने कितीही ऊन असले तरी आजची युवा पिढी मॅचेस बघण्यास इतकी दंग असायची की त्यांना जेवणाची देखील आठवण व्हायची नाही.
मात्र लॉकडाऊन झाले, शाळेला सुट्टी पडली. दोन महिने होऊन गेले गर्दी होणारे कार्यक्रम जत्रा, यात्रा प्रशासनाने रद्द केल्या. त्यामुळे यां नव्या पिढीला आनंदात विरजण पडले, निराश झाले. त्यामुळे नवीन पिढीवर घरातून दारात आणि दारातून घरात घरात बसायची वेळ आली. लॉकडाऊन असल्यामुळे मैदाने ओस पडली असून  या नव्या पिढीचा आनंद कोरोनाने हिरावून घेतला. अनेक होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील क्रिक्रेट यावर्षी तरी पहावयास मिळणार नाही. 

No comments:

Post a Comment

Advertise