सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर


सरकारने हिंमत दाखवावी, सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर
मुंबई : या ठिकाणी सरकार दिसत नाही, कुठे आहे सरकार? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. बोलाचीच कढी आणि बोलाचा भात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मोदींनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त केली आहे. 
सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत,सरकारने हिम्मत दाखवावी आणि सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर 302चा गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर धार्मिक स्थळांचा सर्व पैसा ताब्यात घेऊन गोरगरिबांसाठी वापरावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise