आटपाडी तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित रुग्ण ; तालुक्यात कोरोनाग्रस्त संख्या ७ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, May 21, 2020

आटपाडी तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित रुग्ण ; तालुक्यात कोरोनाग्रस्त संख्या ७


आटपाडी तालुक्यात आज ४ जण कोरोना बाधित रुग्ण ;  तालुक्यात कोरोनाग्रस्त संख्या ७  
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात तालुक्यात आज ४ रुग्ण कोरोना बाधित आल्याने तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७ झाली आहे.
आज नवीन ४ रूग्णामध्ये आटपाडी शहर १, सोनारसिद्धनगर २ व पिंपरी खुर्द येथील १ असे चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.    
आटपाडी शहरामध्ये दिल्लीहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. तर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती निगेटिव्ह आल्याने आटपाडीकरांची धाकधूक कमी झाली होती. परंतु आता मुंबईहून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली असून पिंपरी बुद्रुक येथील बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागणे झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. 
आटपाडी शहरामध्ये गोंदिरा येथे एकजण मुंबईवरून आलेला होता. ग्रामपंचायतीने सदर व्यक्तीस नोटीस देवून त्यास संस्था क्वारंनटाईन होण्यास सांगितले होते. तो आटपाडी येथे संस्था क्वारंनटाईन झाला होता. परंतु त्यास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यास तपासणीसाठी पाठविले होते. 
तर पिंपरी बुद्रुक येथील व्यक्ती ही बाहेर गावाहून आलेली होती. त्या व्यक्तीला संस्था क्वारंनटाइन करण्यात आले होते. परवा रात्री त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यास मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो पॉझिटिव्ह आला 
आजचे चौघेही पॉझिटिव्ह रुग्ण परगावीहून आलेले होते. त्यामुळे आता आटपाडी तालुक्यात ७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली. 

1 comment:

Advertise