शिराळा तालुक्यातील निगडीचे पती-पत्नी कोरोना पॉझिटीव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 17, 2020

शिराळा तालुक्यातील निगडीचे पती-पत्नी कोरोना पॉझिटीव्ह


शिराळा तालुक्यातील निगडीचे पती-पत्नी कोरोना पॉझिटीव्ह 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून काल ५ जण सापडले असून त्यात आता दोन रुग्णांची भर पडली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील निगडीचे पती-पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
सदरचे पती-पत्नी, मुलगा व  मेहुणी असे पाचजण मुंबईहून आले होते. परंतु गावकऱ्यांनी त्यांना गावात प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांना संस्था क्वारंनटाईन करण्यात आले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल आला असून यातील पती-पत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकवेळ सांगली पॅटर्न म्हणून सगळीकडे नाव झालेल्या सांगली जिल्ह्याला पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise