कामथ मध्ये कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 25, 2020

कामथ मध्ये कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११


कामथ मध्ये कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कामथ ता. आटपाडी, जि. सांगली येथील ६५ वर्षाच्या एकजणाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात एकूण ११ जण कोरोना बाधित झाले आहेत.
आज आलेल्या अहवालामध्ये कामथ येथे मुंबईहून आलेल्या ६५ वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सोनारसिद्ध येथील महिलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सोनारसिद्ध मध्ये ३, आटपाडी शहर ३ , पिंपरी खुर्द व पिंपरी बुद्रुक १ बनपुरी १, जांभूळणी १ व कामथ १ असे ११ कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आटपाडी तालुक्यातच आढळून आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise