कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांनी निवडला वेगळा मार्ग... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 25, 2020

कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांनी निवडला वेगळा मार्ग...


कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील  तरुणांनी निवडला वेगळा मार्ग...
माणदेश एक्सप्रेस न्युज
घेरडी/वार्ताहर : सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शहरातील तरुण काम बंद असल्याने गावाकडे आले आहेत. परंतु दैनंदिन जीवनात पैशाची निकड असल्यामुळे गावाकडे सध्या भाजीपाला व फळे विकण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून घरोघरी ताजा भाजीपाला पोहचविण्यासाठी मोटारसायकल व वाहनांच्या माध्यमातून विक्री केली जाते. तसेच लोकांना घरपोच  ताज्या भाज्या मिळत असल्याने विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
 या व्यवसायात अनेक तरुण वर्ग मन लावून काम करत आहे. यामध्ये वाणीचिंचाळे गावातील परमेश्वर लंबे, दिपक घुणे, उमेश वडतिले, नवनाथ जुजारे, सिदु सोपे या तरुणांनी या भाजीपाला व्यवसायात झोकून देऊन काम करत आहेत. या व्यवसामुळे त्यांच्या  हातात चार पैसे मिळु लागलेत. रोज भाजीपाला विक्रीतून हि तरुण पिढी हजार ते दोन हजार रुपये कमवत आहेत. सध्या या काळात हाताला काम नाही म्हणणाऱ्या लोकांना हि  चपराकच असून हे तरुण इतरांना मार्गदर्शक म्हणून भुमिका पार पाडत आहेत. आपल्या कुटुंबाला चार पैसे आपल्या या माध्यमातून कमावुन देत आहेत. यापुढील काळात अनेक बाहेरील मजूर काम  नाही म्हणून आपल्या गावी गेले आहेत. परंतु या वेळी आपल्या हाताला मिळेल ते काम केले तर पुढील काळ सुसह्य होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापुढील काळात अशाच पद्धतीने युवकांनी उद्योग धंद्यात पडून जर आपल्या कुटुंबाला मदत केली तरच प्रगती होईल.

No comments:

Post a Comment

Advertise