नवीन गाडी घेताय, तर नंबर ही आकर्षक घ्या ; सांगली उप प्रादेशिक परिवाहन कार्यालयात नंबरची नवीन मालिका सुरु - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

नवीन गाडी घेताय, तर नंबर ही आकर्षक घ्या ; सांगली उप प्रादेशिक परिवाहन कार्यालयात नंबरची नवीन मालिका सुरु


नवीन गाडी घेताय, तर नंबर ही आकर्षक घ्या 
सांगली उप प्रादेशिक परिवाहन कार्यालयात नंबरची नवीन मालिका सुरु 
माणदेश एक्सप्रेस न्यूज
सांगली : उप प्रादेशिक परिवाहन कार्यालय, सांगली या कार्यालयात दि. 21 मे पासून खाजगी चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु केली आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो.  बऱ्याच वेळा नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. नागकिरकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळावा यासाठी चारचाकी वाहनासाठीच्या नवीन मालिकेतील आकर्षक तसेच पसंती क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 2 या दरम्यान विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. 
प्रथम येणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अर्ज सादर करताना कोविड-19 बाबत दिलेल्या नियमाचे व अटीचे पालन करावे. अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहीत केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षंकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. उदा. लाईटबिल, टेलिफोन बिल इत्यादी. अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र उदा. आधारकार्ड / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत सादर करावी.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बलदून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचेे समायोजन करता येणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise