Type Here to Get Search Results !

संपादकीय : राज्यपालांचा विद्यापीठ परीक्षा घेण्यासाठी बाल हट्ट...!


राज्यपालांचा विद्यापीठ परीक्षा घेण्यासाठी बाल हट्ट...!
     महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे संकट  दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असतानाच महाराष्ट्राचे राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी यांनी मात्र महाराष्ट्र सरकारकडे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परीक्षा घेण्याचा बालहट्ट धरला आहे. राज्यपालांचा हा बालहट्ट थांबवण्यासाठी  मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहून कळवलं आहे की, '' कोरोनाच्या या भयानक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे जीवन महत्त्वाचे आहेत. केवळ तुमच्या आग्रहासाठी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन गमवायला लावू नका. कोरोनामुळे सध्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या  विद्यापीठ परीक्षा रद्द करून पाठीमागील वर्षीच्या किंवा सत्राच्या अंतर्गत किंवा विद्यापीठस्तरीय परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांना यावर्षी ग्रेड देऊन पास करता येऊ शकते.'' असा सल्लाही या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांना दिला आहे.
खरे तर राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी राज ठाकरे यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. तसेच जाणकार व अनुभवी आहेत. एवढेच नाही, तर ते भारतातील महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे राज्यपाल म्हणून पदावर कार्यरत आहेत. तरी ही त्यांच्यापेक्षा वयाने लहान, अनुभवाने कमी व कोणत्याही शासकीय पदावर नसणारे राज ठाकरे यांना जेवढं कळतं तेवढं राज्यपाल महोदयांना  कळत नसेल का? एवढे ते ना समजदार आहेत का? त्यांनी महाराष्ट्रातील 'कोरोनाची भयानक परिस्थिती व विद्यापीठ परीक्षा' या विषयावर चिंतन-मनन केलेले नसेल का? तरी ही ते महाराष्ट्रातील सरकारला विद्यापीठ परीक्षा घेण्यासाठी का आग्रही असावेत हा एक मोठा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो.
पाठीमागील सहा महिन्यापूर्वी सरकार स्थापन करत असताना घडलेल्या घडामोडी व पहाटे पाच वाजता राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांना दिलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ या सर्व घटना प्रसंग यावरून भगतसिंग कोश्यारी यांचे भाजप पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती प्रेम आहे?  हे सर्व महाराष्ट्रानेच नाही तर देशाने अनुभवलेलं आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत, काही ही करून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे होते, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पित्त खवळले. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्या भरवश्यावर उद्धव ठाकरे यांना सळो की पळो करून सोडले आहे. सोबत त्यांनी या कामात मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, नारायण राणे व चंद्रकांत पाटील यांना मदतीला घेऊन उद्धव ठाकरे यांच्या कामात अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात चीनमध्ये जन्माला आलेल्या कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रामध्ये प्रवेश करून मुंबई, पुणे, नागपूर, मालेगाव, सोलापूर या शहरात थैमान घालायला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकारी पक्षांच्या मदतीने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा अतिशय कसोशीने प्रयत्न केला आहे. हळूहळू महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती सुधारत आहे. नेमकं याच वेळी राज्यपाल व त्यांच्या वरील सहकारी मित्रांनी कोरोनाच्या जीवघेण्या वातावरणात राजकारण घुसडायला सुरुवात केली. कोरोनासारखे संकट एकीकडे महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर उठले असताना,  त्याची पर्वा न करता यांचे राजकीय सत्ता आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे संदर्भात वाद निर्माण केला की, '' ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या पासून सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होऊ न शकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नाही. त्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर घटनात्मक मार्गाने उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य झाल्यामुळे या सर्वांची दातखिळी बसली आणि पुन्हा उद्धव ठाकरे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कोरोनाला  पराजित करण्यासाठी कंबर कसली. केंद्र सरकार कडून अपेक्षित असणारे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले नसताना, महाराष्ट्रातील भाजपच्या एकही नेत्यांचे सहकार्य नसताना उद्धव ठाकरे यांनी नियोजन बद्द कोरोनाला नियंत्रित करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये राजकीय सत्ता मिळवण्यासाठी केलेले सगळे   प्रयत्न असफल झाले, तरी ही या लोकांची महत्त्वाकांक्षा कमी झाली नाही, ते पुन्हा राज्यपालांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या परीक्षा राज्य सरकारला घेण्यासाठी भाग पाडून पुन्हा कोरोनाचा  धिंगाना घालायला लावतील व नंतर कोरोनाला पराजित करण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरले, म्हणून शिमगा करतील व राष्ट्रपती राजवट  आणून  केंद्रातील सत्तेच्या जोरावर, न्यायव्यवस्थेच्या आधाराने व संपत्तीच्या बाळा चा पुरेपूर उपयोग करून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे खेचून आणतील. यासाठी केले जाणारे हे हे प्रयत्न तर नाहीत ना.? जेवढे राज ठाकरे यांना कळते तेवढे सुद्धा जर राज्यपालांना कळत नसेल तर या मागे निश्चितपणे राज्यपाल व त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा डाव आहे. पण त्यांचा हा प्रयत्न सफल होणार नाही. कारण महविकास आघाडीकडे शरद पवार यांचे सारखे धुरंदर पाठीराखे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies