सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 25, 2020

सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप


सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/ विष्णू भोंगळे : सध्या देशात व राज्यात लॉकडाऊन असल्याने गोर-गरीब नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगामधून शासनाने १५ टक्के मागासवर्गीय निधीमधून जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचे आदेश दिले दिल्याने सदाशिवनगर ता. माळशिरस, जि. सोलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मागासवर्गीय १५% निधीतुन ३०० कुटुंबाला जीवनाश्यक वस्तु व सॅनिटाझरचे वाटप करण्यात आले.  
रिपाइं (आठवले) जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, ग्रामसेवक प्रंशात रूपनवर, तलाठी शरद खांडेकर, माजी सरपंच नागनाथ ओवाळ, ग्रा.प. सदस्य व पत्रकार विष्णु भोंगळे (सर), माणिकराव सुळे, तुकाराम चव्हाण, राजेंद्र जाधव, आप्पा लोंढे, गणेश ओवाळ, अवि बनसोडे, अजित धाईजे व इतर मान्यवराच्या हस्ते सदरचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise