Type Here to Get Search Results !

गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप ; माने-पाटील परिवाराचे दातृत्व ; ५०० कुटुंबियांना मदतीचा हात


गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
माने-पाटील परिवाराचे दातृत्व ; ५०० कुटुंबियांना मदतीचा हात
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : अकलूजच्या माने-पाटील परिवाराने युवा उद्योजक सुजयसिंह माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज, बागेवाडी परिसरातील पाचशे गरजू व गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल असा किराणा माल देऊन मदत केली. याचबरोबर माळशिरस तालुक्यातील प्रशासनाला वैद्यकीय साधनसामग्री खरेदी करण्यासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश सुजयसिंह माने-पाटील यांनी दिला. कोरोना कालावधीत सगळीकडेच बंद व हाताला काम नसल्याने उपासमारीच्या कालावधीत मदत मिळाल्याने या परिसरातील नागरिकांकडून माने-पाटील परिवाराचे आभार मानले जात आहेत.
सामाजिक भान असणारे सुजयसिंह माने-पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन व सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जि.प.चे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसानिमित्त आदि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माळशिरसचे तहसीलदार अभिजीत पाटील, एपीआय नागेश यमगर यांच्या हस्ते बागेवाडी व आक्रोश परिसरातील नागरिकांना केले. यावेळी हंसराज माने-पाटील, कृष्णराज माने-पाटील, जयराज माने-पाटील, अभिराज माने-पाटील, उपसरपंच नामदेव माने, रामभाऊ रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागाला वैद्यकीय साधनसामग्री घेण्यासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश सुजयसिंह माने पाटील यांनी दिला असून बागेवाडी व आसपासच्या परिसरात कामगार वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी असणाऱ्या सर्वांनाच काम नसल्याने या भागातील कुटुंबांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. सुजय माने-पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कामगारांना, कष्टकऱ्यांना मदत केल्याने त्यांच्या वाढदिवसाला आम्ही त्यांना आशीर्वाद व्यतिरिक्त काहीही देऊ शकत नाही आणि हा आशीर्वादच त्यांना भविष्यात कामी येईल .रामभाऊ रणपिसे, नागरीक बागेवाडी
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies