म्हसवड मध्ये रक्तदान संपन्न : १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 30, 2020

म्हसवड मध्ये रक्तदान संपन्न : १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान


म्हसवड मध्ये रक्तदान संपन्न : १०१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी स्वयंफूर्तीने रक्तदान केले. 
राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने म्हसवड येथेही रक्तदान शिबीर आयोजीत केले होते. या शिबीरामध्ये म्हसवड शहरातील  सर्व नागरिक, सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष व सर्व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी धनंजय भोसले, बंटी माने, शिवाजी माने, गणेश माने, गणेश शिर्के, अजय माळी, रूपेश माने, बबलु मोरे इत्यादींनी परिश्रम घेतले. अक्षय ब्लड बॅंकेचे अध्यक्ष संजयकुमार शिंदे, डॉ. नविनकुमार कोरे, अजय रुपनर (जनसंपर्क अधिकारी), आनंद घाटे, पूजा ननवरे, स्वाती काळे, तुळशीदास आयगोळे, संकेत बेडगे, स्वप्नील शिंदे यांचे या शिबीरात विशेष सहकार्य लाभले 
या शिबीर मध्ये सहभाग घेऊन रक्तदान केलेबद्दल संयोजक व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष  धनंजय  भोसले ,व बंटी माने यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise