तरसवाडी (पिंपरी.बु) येथील एका संशयिताची मिरज कोविड सेंटर येथे रवानगी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, May 31, 2020

तरसवाडी (पिंपरी.बु) येथील एका संशयिताची मिरज कोविड सेंटर येथे रवानगी


तरसवाडी (पिंपरी.बु) येथील एका संशयिताची मिरज कोविड सेंटर येथे रवानगी
माणदेश एक्सप्रेस न्युज 
खरसुंडी/मनोज कांबळे : तरसवाडी (पिंपरी बुद्रुक) ता. आटपाडी येथील एका कोरोना संशयिताची आज मिरज कोविड सेंटर येथे रवानगी करण्यात आली.
 याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७ मे रोजी मुंबई (शिवडी) येथून संशयित व्यक्ती तरसवाडी येथे आला होता. आजारी असल्याने या व्यक्तीला दोन दिवसापासून खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपचार सुरू होते. ५१ वर्षाच्या या संशयित व्यक्तीला कोरोना आजाराची लक्षणे जाणवून आल्याने कोरोना चाचणीसाठी आज मिरज कोविड सेंटर येथे पाठवण्यात आल्याची माहिती खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.महेश जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise