अफवा पसरवू नका, राजकारण करू नका ! जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले ; राष्ट्रवादीचा गडचिंचोली घटनेशी काडीमात्र संबंध नाही; घटना घडली तेव्हा भाजपच्या चित्रा चौधरी तिथे उपस्थित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, April 21, 2020

अफवा पसरवू नका, राजकारण करू नका ! जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले ; राष्ट्रवादीचा गडचिंचोली घटनेशी काडीमात्र संबंध नाही; घटना घडली तेव्हा भाजपच्या चित्रा चौधरी तिथे उपस्थित


अफवा पसरवू नका, राजकारण करू नका !  जयंत पाटील यांनी भाजपच्या संबित पात्रांना सुनावले
राष्ट्रवादीचा गडचिंचोली घटनेशी काडीमात्र संबंध नाही; घटना घडली तेव्हा भाजपच्या चित्रा चौधरी तिथे उपस्थित 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई :  गडचिंचोली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काही संबंध नाही. संबित पात्रा यांनी अफवा पसरवू नये तसेच या दुर्देवी घटनेचे राजकारण करू नये अशा कडक शब्दात राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना सुनावले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पालघर येथे घडलेल्या घटनेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पात्रा यांना प्रतिउत्तर दिले आहे. जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ज्या भागात ही घटना घडली तिथल्या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तिथल्या सरपंच तथा भाजपच्या पदाधिकारी चित्रा चौधरी तिथे उपस्थित होत्या. पोलिसांनी बोलावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता तिथे गेला होता. भारतीय जनता पक्षाने अशा कठीण काळात राजकारण करू नये असेही पाटील म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise