अहिंसा पतसंस्थेकडून सत्कार सोहळा संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

अहिंसा पतसंस्थेकडून सत्कार सोहळा संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : येथील श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या नवीन विश्वस्त मंडळाचा सत्कार सोहळा नुकताच अहिंसा पतसंस्थेत पार पडला. विश्वस्त मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष महावीर व्होरा यांचा सपत्नीक सत्कार  अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांचे हस्ते करण्यात आला. तर विश्वस्त मंडळाचे विश्वस्त अजितकुमार व्होरा, प्रीतम शहा, संतोष दोशी, शशीकिरण देशमाने, राजकुमार तिवाटने, महेंद्रकुमार मोडासे यांचे अनुक्रमे सपत्नीक फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पतसंस्थेचे संचालक डॉ.राजेश शहा म्हणाले की, अहिंसा पतसंस्था ही नेहमी चांगल्या कार्यात अग्रेसर असते, नव्या विश्वस्त मंडळाला प्रेरणा मिळावी, म्हणून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून मंदिरात नवनवीन उपक्रम राबवून मंदिराची जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल याची उमेद मिळेल, संस्थेचे संचालक अभिराज गांधी यांनी नवीन विश्वस्तांना शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी म्हणाले की, एखादी संस्था, ट्रस्ट चालवताना त्याच्या अध्यक्षांनी सर्वच जे ट्रस्टी आहेत ते पण अध्यक्ष आहेत असं समजून सर्वांना बरोबर घेऊन जर कार्य केले तर ते सर्वोत्तम कार्य होते. चांगले कार्य करताना तुमचा बहुमान नक्कीच वाढेल त्यावेळी तुम्हाला विरोधकही निर्माण होतील, पण विरोधकांचा विचार न करता आपले कार्य प्रामाणिकपणे अविरत चालू ठेवावे.
तर, मला समाजाप्रती ऋण व्यक्त करण्याची जी संधी दिली आहे या संधीचे नक्कीच सोने करीन व समाजाने  जी जबाबदारी माझ्या व माझ्या अन्य सहकार्यावर दिली आहे ती नक्किच तन मन धन अर्पून आमची जबाबदारी पार पाडेन. समाजाचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करेन असे महावीर व्होरा म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार निरज व्होरा यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise