माजी विद्यार्थी अभिजित कानडे हे सकारात्मक विचारांचे होते' स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 10, 2019

माजी विद्यार्थी अभिजित कानडे हे सकारात्मक विचारांचे होते' स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : ‘स्वेरीचे माजी विद्यार्थी अभिजीत कानडे हे विद्यार्थी दशेत असताना अत्यंत सकारात्मक विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांचे कार्य विशेष लक्षात रहात होते. अभ्यास करण्याची वृत्ती आणि नेतृत्व गुण या त्यांच्या गुणांचे इतर विद्यार्थी अनुकरण करायचे असे हे विद्यार्थी प्रिय मित्र अचानक आपल्यातून निघून गेले असून त्यांच्या कार्याला सलाम.’ अशा शब्दात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी कै.अभिजीत कानडे यांना श्रद्धांजली वाहिली. 
स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातून २००३ साली उत्तीर्ण झाल्यानंतर अभिजीत आनंदराव कानडे हे पुण्याच्या ए.व्ही. इंडस्ट्रीजमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काल (दि.०८ डिसेंबर २०१९) त्यांचे पुण्यात हृदय विकाराने दुर्दैवी निधन झाले. स्वेरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते कालपर्यंत स्वेरीच्या वाटचालीकडे सतत लक्ष ठेवून असणारे अभिजित कानडे यांच्या अकस्मात निधनाने मोठा धक्का बसला आहे. स्वेरीमध्ये कै.अभिजित कानडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी त्यांचा अनुभव व त्यांच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, डॉ. माधव राऊळ, ग्रंथपाल प्रा. एस. एम. बागल, प्रा. जे.ए. केंदुळे, प्रा.प्रज्ञा भुसे, प्रा.दिग्विजय रोंगे, प्रा. पी.जी.गायकवाड, बालाजी सुरवसे व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise