Type Here to Get Search Results !

वरकुटे-मलवडीत महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ; स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवी मुल्यांची गुंफण करून बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले : प्रा. होनमाने.

 माणदेश एक्सप्रेस न्युज
वरकुटे-मलवडी/प्रतिनिधी : स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या मानवी मुल्यांची गुंफण करुन भारतीय लोकशाहीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच कवच दिलं. भारतीय संविधान हे संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ असून, सद्यस्थितीत देशातील कसोटीचा काळ आहे, अशा परिस्थीतीत बाबासाहेबांनी दिलेली शिकवण आणि मुल्यांसाठी आग्रही राहणे, त्याचे रक्षण करणे हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल असे मत प्रा.सचिन होनमाने यांनी व्यक्त केले.
वरकुटे-मलवडीतील समस्त ग्रामस्थ व पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने आण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी सरपंच बाळकृष्ण जगताप, विक्रम शिंगाडे, सोसायटीचे अध्यक्ष किरण जाधव, नवनाथ ढेरे, संपादक बापुसाहेब मिसाळ, मल्हारी जगताप, धिरज जगताप, जयसिंग नरळे, बाबाराजे हुलगे, सदाशिव बनगर, सुनिल थोरात, अर्जुन यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सरपंच बाळकृष्ण जगताप, विक्रम शिंगाडे, धिरज जगताप, मल्हारी जगताप, यांनी तथागत गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी विक्रम शिंगाडे, साहिल तांबोळी, बियांदसिंग जगताप यांनी बाबासाहेबांचे विचार-संदेश मनोगताच्या रुपाने व्यक्त केले. उपस्थित ग्रामस्थांनी ६३ मेणबत्त्या प्रज्वलित करीत पत्रकार सिद्धार्थ सरतापे यांनी सामुदायिकरित्या त्रिसरण, पंचशील ग्रहन करुन घेत, महामानवाला अभिवादन केले. यावेळी केराप्पा बनसोडे, वामन तोरणे, अशोक केंगार, सुरेश यादव, आयुब मुल्ला, महाविर काटकर, बाबा मंडले, दिलीप बनसोडे, प्रशांत बनसोडे अमोल यादव, हरी राऊत, विक्रम कोळी, नौशाद सय्यद, अंकुश यादव,पप्पु चव्हाण, अरूण केंगार आदी युवक, अनुयायी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काळेल यांनी केले तर आभार अर्जुन यादव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies