उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल विटा पालिकेची दंडात्मक कारवाई ; खबरदार उघड्यावरच एकत्र टाकाल तर होईल दंड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 2, 2019

उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल विटा पालिकेची दंडात्मक कारवाई ; खबरदार उघड्यावरच एकत्र टाकाल तर होईल दंड.माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा : विटा नगरपरिषद विटा यांच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची तयारी करत असताना विटा शहरातील सर्व नागरिकांना कचरा घंटागाडीत देण्याचे आव्हान केले जात आहे. या माध्यमातून शहरांमध्ये दररोज घंटागाडी शंभर टक्के कचरा संकलन करत आहे. परंतु अपवादात्मक काही नागरिक उघड्यावर ते कचरा टाकत आहेत असे निदर्शनास आले. या घटनेच्या माध्यमातून विटा नगरपालिकेने धडक पथकाची निर्मिती केली व सकाळी व रात्री उघड्यावरचे कचरा टाकणाऱ्या नागरिकांना चाप बसावा यासाठी शहरातील विविध ठिकाणी हे भरारी पथक तैनात करण्यात आले या पथकाच्या कारवाईमध्ये काल  दि. 1 रोजी तासगाव रोड येथील हुंडाई शोरूमच्या बाजूस ओढ्यालगत जवळजवळ एक ट्रॉली पेक्षा जास्त कचरा आढळून आला. यामध्ये बांधकामाचा राडा, घरगुती घातक कचरा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून आले. सदर कचऱ्याची सविस्तर चौकशी केली असता विटा शहरात फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे आस्लम मुल्ला यांच्या जुन्या घराचा हा कचरा आहे हे सिद्ध झालं. सदर घटनेची दखल घेत विटा पालिकेच्या पथकाने आस्लम मुल्ला यांची चौकशी करत माहिती जाणून घेतली असता, सदर कचरा या घराचे कामकाज करणारे प्रशांत ढगे यांना हा कचरा डेपो वरती देण्यास सांगितला होता. परंतु प्रशांत ढगे यांनी हा कचरा तासगाव रोड येथे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती टाकला. यावेळी प्रशांत ढगे यांना आर्थिक दंड करण्यात आला. त्याचबरोबर सदर कचरा उचलून देण्याची कारवाई विटा पालिकेने केली. घनकचरा अधिनियमानुसार प्रशांत ढगे यांना रुपये 1000  उघड्यावर कचरा टाकले बाबत दंड आकारण्यात आला. यावेळी आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत पथकाचे सदस्य नितीन चंदनशिवे, रोहित पवार, राजू पाटील, रामदास निकम यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी उघड्यावर कचरा टाकण्याबाबत कडक भूमिका घेतली असून यापुढे उघड्यावरचे कचरा पडेल तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे. कचरा उघड्यावर न टाकता वेगळा करून घंटागाडीत द्यावा व स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये योगदान द्यावे या पालिकेच्या कारवाईमुळे व्यावसायिकांसह नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise