धुळदेव ता. माण येथे शाळेच्या शिपायानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

धुळदेव ता. माण येथे शाळेच्या शिपायानेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड : धुळदेव ता.माण येथील महाकाळेश्वर विद्यालयाचा शिपाई जयाप्पा कुंडलीक कोळेकर‌ (वय ४५) याने शाळेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थींनीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून मुलीच्या वडीलांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की,शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाच्या कार्यक्रमासाठी धुळदेव येथील महाकाळेश्वर विद्यालयाती आठ विद्यार्थींना घेऊन  शाळेचा शिपाई जयाप्पा कुंडलीक कोळेकर हा सातारा येथे गेला होता. सायकल घेऊन सगळेजण परत धुळदेव येथे  बुधवारी (ता.१८) रात्री पोहचल्यानंतर  रात्री आठ  वाजता  गुंजाळखडी शिवारात नागोबा मंदिराच्या जवळ त्यातील एका अल्पवयीन मुलीला गाठून तिच्याशी गैरवर्तन केले,तु मला आवडते, असे सांगून अंगाशी झोंबाझोंबी केली, सदर मुलीने आरडाओरडा केला. कोळेकर यांच्या हाताला झटका देऊन ती घरी गेली. 'हा प्रकार कुणाला सांगु नकोस नाहीतर तुला जीवे मारीन' अशी धमकी ,जयाप्पा कोळेकर यांनी त्या मुलीला दिली.
अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी म्हसवड पोलीसात दिली आहे.
अधिक तपास सपोनि. गणेश वाघमोडे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise