गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी महामुनी हिने पटकावला ; तालुक्याच्या वतीने गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 14, 2019

गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक सिद्धी महामुनी हिने पटकावला ; तालुक्याच्या वतीने गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
 माळशिरस प्रतिनिधी  : बीटस्तरीय टँलेंट हंट स्पर्धा आनंदनगर येथे पार पडल्या.या स्पर्धा नऊ प्रकारच्या होत्या.या स्पर्धेत जि.प.प्राथ.शाळा,शेरीवस्ती येथील विद्यार्थीनी सिद्धी संतोषकुमार महामुनी हीने गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून बीट माळशिरसच्या वतीने तिला गोल्ड मेडल व पुष्पगुच्छ देऊन कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख नाचणेसाहेब यांनी सन्मान केला. यावेळी परीक्षण करणारे पाठ्ये सर व कोरबू  उपस्थित होत्या.या गीतासाठी संतोष महामुनी  व सुहास दिक्षित यांनी मोलाची साथ दिली. या गीतासाठी केंद्रप्रमुख पालवेसाहेब व आप्पासाहेब गोरड यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले. या विद्यार्थिनीने जि प प्रा शाळा शेरीवस्तीचे नाव तालुक्यात गाजवले असून तिला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise