भिवंडीत राष्ट्रवादी कडून सन्मान महिला धोरणांचा कार्यक्रम सपंन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

भिवंडीत राष्ट्रवादी कडून सन्मान महिला धोरणांचा कार्यक्रम सपंन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
भिवंडी प्रतिनिधी : महिलांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार  देऊन महिला सक्षमीकरणासाठी ३३ टक्के आंरक्षणाची सर्व प्रथम अंमलबजावणी करणाऱ्या  शरद पवार  सजग महिला धोरणांमुळेच  आज आम्ही महिला  महापौर आहोत, असे प्रतिपादन भिवंडी च्या महापौर प्रतिभा पाटील यांनी नुकतेच भिवंडी येथे एका कार्यक्रमात केले आहे.
 तसेच शरदचंद्र पवार मुख्यमंत्री असताना  त्यानी  १९९३ साली  महिलाना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील सहभाग वाढावा .  त्यांचे सबलीकरण व्हावे म्हणून  महिला आयोगाची स्थापनां, महिला व बालविकास विभागाची स्थापनां, बचत गट, महिलाना  सैन्यात प्रवेश आदी महत्वाचे निर्णय घेऊनं त्या निर्णयाना   बळकटी देऊन  महिला  धोरणांचा  सन्मान शरद पवार यांनी  केला आहे, असे आपल्या प्रस्तावनेत आयोजक स्वाती कांबळे  सागिंतले.
भिवंडी तालुक्यात राष्ट्रवादी महिला कोंग्रेस पार्टी कडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार याच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान महिला धोरणांचा हा कार्यक्रम दांडेकर
विद्यालयाशेजारील मंगलमुर्ती मॅरेज ह येथे भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील तसेच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ट पोलीस निरीक्षक ममता डिसोजा तसेच राष्टवादीच्या    भिवंडी महिला जिल्हा अध्यक्षा  स्वाती कांबळे यांच्या हस्ते केक कापुन साजरा करण्यात आला.  तसेच त्याच्या  शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भिवंडी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला शाहीन कादीर मोमीन, सुषमा प्रदीप अग्रवाल, वैशाली मैस्त्री, संध्या पवार, कुसूम देशमुख, संगिता चाफेकर, कोमल पाटील, अनिता सांबले, मंदिंरा गुप्ता, रेंहाना अन्सारी, भाग्यश्री उघडे आदी महिलाना पवार साहेबाचा फोटो आसलेली ट्राफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भिवंडी शहरातील राष्ट्रवादी महिला कोंग्रेस पार्टी चे विविध पदाधिकारी तसेच अनिल फडतरे, राजेश चव्हाण, जावेद फारूकीसह, शेकडो महिला उपस्थित होत्या. दरम्यान देशांतील महिलांवरील वाढते अत्याचाराविषयी या कार्यक्रमात महिलानी 
स्वरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स आत्मसात करावे असे आव्हान शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पो. निरीक्षक ममता डिसोजा यांनी केले यावेळी  कराटेचे शिक्षक पठाणसर याच्या  टीमने कराटेचे प्रात्यक्षिके करुन दाखवली
.

No comments:

Post a Comment

Advertise