करगणीत विवाहतेची आत्महत्या ; दीड महिन्यापूर्वी झाले होते लग्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

करगणीत विवाहतेची आत्महत्या ; दीड महिन्यापूर्वी झाले होते लग्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी /प्रतिनिधी :  केवळ दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या   करगणी (ता.आटपाडी) येथील नव विवाहितेने गळफास लावून घेउन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सौ. दिव्या सुरज खिलारी (वय१९)  यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास लावून घेतला.
 दीड महिन्यापूर्वी सूरज आणि दिव्या यांचे लग्न झाले. विवाहितेचे माहेर किडबिसरी (ता. सांगोला जि. सोलापूर ) आहे. घटनेबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद पती सुरज अर्जून खिलारी यांनी दिलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडखडी, खिलारीवस्ती करगणी येथे दिव्या हिने नवीन बांधकाम चालू असलेले घरातील लोखंडी ॲगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरा करगणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विवाहितेच्या नातेवाईकांनी गोंधळ केला. तणावाची परिस्थिती असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिक तपास पोलीस  निरिक्षक बजरंग कांबळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise