शिक्षकामुळे पुढील पिढी घडते : मंदाताई करांडे . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

शिक्षकामुळे पुढील पिढी घडते : मंदाताई करांडे .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
कडेगाव/प्रतिनिधी : शिक्षक मुलांना घडवतात, संस्कार करतात आणि यातूनच पुढिल भावी पिढी घडत असते. तेच पुढे देशाचे आधारस्तंभ बनत असतात.  असे वक्तव्य कडेगाव पंचायतीच्या सभापती सौ मंदाताई करांडे यांनी व्यक्त केले.
 त्या तोंडोली (ता.कडेगाव) येथे तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या कार्यक्रमा निमित्त त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परीषदेच्या सदस्या सौ.रेश्माताई सुर्यवंशी, शांताताई कनूंजे, गटविकास आधिकारी दाजी दाईंगडे, तालूका पंचायत सदस्य आशिष घाडगे, रविंद्र ठोंबरे यांनीमनोगत व्यक्त केले.
सौ.करांडे यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक यशवंत हायस्कुल देवराष्ट्रे, व्दितीय क्रमांक महात्मा गांधी विद्यालय कडेगाव, तृतीय क्रमांक श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोली च्या विध्यार्थींनी पटकावला. यावेळी गटशिक्षण अधिकारी विकास राजे, सरपंच सौ.अनिता महापुरे, उपसरपंच सर्जेराव मोहिते, शाळेचे प्रभारी मुख्याध्यपक ए.डी. मोहिते, जेष्ठनेते शंकरनाना मोहिते-पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगतसिंग मोहिते, युवा नेते सुनिल मोहिते, शिवाजी मोहिते, अजित मोहिते, पांडूरंग मोहिते, मिलींद मोहिते परीसरातील शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाप, विद्यार्थी-विद्यार्थींनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

No comments:

Post a Comment

Advertise