माडगुळे येथील विठ्ठल संभाजी लिंगडे यांचे निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 12, 2019

माडगुळे येथील विठ्ठल संभाजी लिंगडे यांचे निधन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माडगुळे/वार्ताहर : कृषी क्षेत्रात ठसा उमटवणारे माऊली कृषी सेवा केंद्राचे मालक विठ्ठल लिंगडे यांचे मंगळवारी उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते 47 वर्षाचे होते. 
आटपाडी तालुक्यात कृषी क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून त्यांना ओळखले जात. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात विशेष करून कृषी क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. विठ्ठल लिंगडे यांनी हलाखीच्या परिस्थितीतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आटपाडी येथील खाजगी कृषी सेवा केंद्रात  नोकरी करीत त्यांनी, आपले स्वतःचे माऊली कृषी सेवा केंद्र नावाचे   कृषी सेवा केंद्र चालू केले. त्यांनी गावातील अनेक विकास कामांना हातभार लावला. गावातील हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर,  जीर्णोद्धार, शाळेस मदत करणे, गावातील सामाजिक कार्यात मदत करणे यात ते अग्रेसर होते. ते हनुमान मंदिर ट्रस्टचे काम पाहत होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने माडगुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन मुले आहेत असा परिवार आहे. रक्षा विसर्जनाचा शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी ८.०० वा. माडगुळे येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise