Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या  संधी उपलब्ध करुन देणाऱ्या  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत नव्यानेच कार्यान्वित झालेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना 100 टक्के ऑनलाईन कार्यप्रणालीनुसार राबविण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्जासाठी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सह संचालक पी.जी. राठोड यांनी केले आहे.
योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी कमाल रु. 10.00 लाखाचे व उत्पादन प्रकल्पासाठी कमाल रुपये 50 लाखांचे अर्थसहाय्य बँकेमार्फत दिले जाते. ज्यामध्ये शासनाचे अनुदान प्रवर्गनिहाय 15 ते 25 टक्के देय आहे. तसेच अर्जदाराची स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के भरावी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies