श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरसमध्ये भरला आनंदी बाजार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 24, 2019

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरसमध्ये भरला आनंदी बाजार.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस याठिकाणी आनंदी बाजार भरवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाम मिसाळ (शाखाधिकारी, बँक ऑफ इंडिया माळशिरस) उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब देशमुख उपस्थित होते. 
आनंदी बाजाराचा आनंद घेण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थी विविध पोशाखात साहित्य विकण्यास घेऊन आले होते. यामध्ये भाजी, फळे, फुले पासून खारेमुरे, शेव-चिवडा, भेळ, वडापाव-भजी, पाणीपुरी, इडली, गुलाब जामुन, चहा यासारखे खाण्याचे पदार्थ होते. तर शालेय साहित्य पेन, वह्या, शालेय स्टेशनरी, कापडी पिशवी विक्रेता, फुगेवाला, पुस्तके यांनी गर्दी खेचली.
आपले साहित्य विक्रीसाठी अनेकांनी विविध प्रकारच्या जाहिराती, क्लुर्प्त्या केल्या होत्या. सर्वच प्रकारची खरेदी करण्यात पाहुणे, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांची झुंबड उडाली होती. काहीजण खाण्यात दंग तर काहीजण बाजारचा मनसोक्त आनंद घेत होते. यावेळी बाळासाहेब सरगर व शाम मिसाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविल्याचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री अनुभव मिळावा व दैनंदिन व्यवहारात याचा वापर व्हावा हा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी गणपतराव वाघमोडे, बाळासाहेब सरगर, महादेव माने, निलेश घाडगे, विजय देशमुख, महेश बोत्रे, रावसाहेब देशमुख, प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise